सामाजिक माध्यमांचा समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठीच वापर व्हावा !

आज आंतरजाल (इंटरनेट) आणि सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) ही अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. काही जण त्याचा वापर वैयक्तिक कारणासाठी करतात. यात बर्‍याचदा गाणी ऐकणे, चित्रपट पहाणे, खेळ खेळणे आदी मनोरंजनात्मक गोष्टींचा समावेश असतो. यातून अंतिमतः निष्पन्न काहीच होत नाही. उलट आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ वाया जातो. यासाठी सामाजिक माध्यमांचा वापर विधायक कारणासाठी झाला पाहिजे. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

१. संपर्क यंत्रणांचे पालटते स्वरूप !

‘आधुनिक काळातील आंतरजालाच्या (‘इंटरनेट’च्या) सुविधेमुळे व्यक्तीसाठी संपूर्ण जग फारच जवळ आले आहे. पत्रपेटी, तार आदी पारंपरिक संपर्क यंत्रणा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत, तर घराघरांत असलेल्या दूरभाषचे (‘लँडलाईन फोन’चे) महत्त्वही अल्प झाले आहे. आंतरजालामुळे संपर्क यंत्रणांमध्ये क्रांतीकारी पालट होऊ लागले. अशात भ्रमणभाषचा झालेला उदय, हा याच क्रांतीकारी पालटाचा आविष्कार होय. आंतरजाल यंत्रणेमुळे आपल्याला एका क्षणात जगातील कानाकोपर्‍यांत आपले मित्र, नातेवाइक आदींशी संपर्क साधून संदेशांची देवाण-घेवाण करणे सुलभ झाले. यातच विविध संकेतस्थळे (वेबसाईट्स), व्हॉट्सॲप आणि विविध सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) संदेशांची देवाण-घेवाण (चॅट) करणारी माध्यमे उदयास आली. या माध्यमांनी समाजमनावर चांगलेच नियंत्रण मिळवल्याचे दिसून येते.

२. सामजिक माध्यमांमुळे मानव जगाच्या जवळ गेला; पण स्वतःच्या कुटुंबापासून दूर गेला !

या माध्यमांचे जसजसे महत्त्व वाढत गेले, तसतसे लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्व जण या मायावी जगात गुरफटले गेले. विशेषतः भारतातील नागरिक खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार यांमध्ये गुंतले आहेत. ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सॲप’सारख्या संपर्क यंत्रणांमुळे तर शेकडो, सहस्रो मैल लांब असलेल्यांना मानवाने जवळ केले; पण कुटुंबातील ज्या व्यक्ती जवळ आहेत, त्यांच्यापासून मानव स्वत: मात्र लांब गेला. या माध्यमांमुळे समाजाची अपरिमित नैतिक हानी झाल्याचे लक्षात येते.

श्री. रवींद्र बनसोड

३. सामाजिक माध्यमे हिंदूंसाठी ठरत आहेत वरदान !

असे असले, तरी याच माध्यमांमुळे हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्यही मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा भरपूर लाभ झाल्याचेही दिसून येते. विविध संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांचा समाजातील बहुतांश व्यक्ती मनोरंजन, खेळ, तसेच स्वार्थपूर्तीसाठी पुरेपूर उपयोग करून घेत असल्याचे दिसते. त्याच्या विरुद्ध हिंदूंमध्ये एक विशेष वर्ग असा आहे की, जो स्वत:साठी नाही, तर आपला देश, हिंदु धर्मरक्षण, हिंदूसंघटन, हिंदुजागृती, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण, हिंदु संस्कृती, इतिहासप्रबोधन इत्यादींसाठी सोशल मिडिया अन् संकेतस्थळे यांचा उपयोग उत्तमरितीने करून घेत आहे.

४. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करणार्‍या वैचारिक योद्ध्यांना सामाजिक माध्यमरूपी वैचारिक शस्त्र गवसणे

स्वातंत्र्यापासून देशातील जनतेला लोकप्रतिनिधींनी विशेषतः काँग्रेसींनी अंधारात ठेवले. एवढेच नव्हे, तर हिंदुद्वेष्ट्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून हिंदूंना अल्पसंख्यांक बनवून कुणी इस्लामी, तर कोणी ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे कारस्थान रचले. आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली हिंदूंना निधर्मी करण्याचे यशस्वी प्रयत्न या मंडळींनी केले. अशात निःस्वार्थपणे राष्ट्र अन् धर्म कार्य करणार्‍या वैचारिक योद्ध्यांना सामाजिक माध्यमांच्या रूपाने हाती वैचारिक शस्त्र गवसले अन् त्याचा त्यांनी समाज, राष्ट्र आणि धर्म हितासाठी वापर करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे हिंदुजागृती, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासह धर्मशिक्षण देण्याच्या कार्यास एक अभूतपूर्व गती प्राप्त झाली. त्यातून हिंदू जागृत होण्यासह लहान-मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ते आदी एकत्र येऊ लागले. परिणामस्वरूप जिहादी, ख्रिस्ती मिशनरी, तसेच जातीपातींच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍यांच्या कारवायांना मोठ्या प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येत आहे.

५. सामाजिक माध्यमांचा विधायक वापर व्हावा !

त्यामुळे हिंदूंनो, आधुनिक सामाजिक माध्यमे, संगणक, भ्रमणभाष आदींचा केवळ वेळ घालवण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांसाठी लाभ करून घ्यायला शिका. यातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या कार्यासह तुमची साधनादेखील होईल.’

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– श्री. रवींद्र बनसोड, फोंडा, गोवा. (१०.७.२०२०)

सामाजिक माध्यमे नसती, तर…

१. ‘स्वार्थी आणि संकुचित वृत्तीच्या राजकीय पक्षांच्या राष्ट्र अन् हिंदु धर्मद्रोही कारवाया जनतेला कळल्या नसत्या.

२. नेहरू-गांधी कुटुंबियांचे खरे स्वरूप आणि त्यांची अल्पसंख्यांकधार्जिणी वृत्ती कळली नसती.

३. साम्यवाद्यांनी दडवून ठेवलेला हिंदूंचा खरा इतिहास पुढे आला नसता.

४. जिहाद आणि त्याचे स्वरूप उघड झाले नसते.

५. धर्मांध ख्रिस्त्यांचे उपद्व्याप उघड झाले नसते. अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतपेटीला आव्हान देता आले नसते.

६. काश्मीर, केरळ, बंगाल आणि अन्यत्र हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या हत्या अन् हिंदूंची अवस्था कळली नसती.

७. जागतिक स्तरावर हिंदु धर्म, देवता, संत, तसेच ग्रंथ यांचे होणारे विडंबन कळले नसते. हिंदूसंघटन, राष्ट्ररक्षण, गोवंश आणि संस्कृती यांच्या रक्षणाचे कार्य करणार्‍यांना बळ मिळाले नसते. तुम्ही-आम्ही सर्वच अद्यापही ‘अंधारा’तच असतो.’