लघुरुद्र चालू असतांना शिवपिंडीवर मानस बेल वहात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हर-हरि एकच आहेत’, या संदर्भात साधिकेला दिलेली अनुभूती

आज माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१ मार्च २०२२) या दिवशी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने…

सौ. स्नेहा गिरीश पुजारी

१. लघुरुद्राचे पठण चालू असतांना ‘शिवाची मानसपूजा करूया’, असा विचार मनात येणे

‘आमच्या घरी लघुरुद्र होता. त्या वेळी माझ्या मनात ‘शिवाची मानसपूजा करूया’, असा विचार आला. गुरुजी लघुरुद्राचे मंत्र म्हणत असतांना मी ‘शिवाच्या पिंडीवर बेल वहात आहे’, असा भाव ठेवला.

२. शिवपिंडीच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसून त्यांच्या एका चरणावर बेलपत्र, तर दुसर्‍या चरणावर तुळशीपत्र दिसणे

मी शंकराच्या पिंडीसमोर बसून शिवाच्या पिंडीला मानस बेल वहात असतांना मला शिवपिंडीच्या जागी परात्पर गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चरण दिसत होते. त्या वेळी मला ‘त्यांच्या एका चरणावर बेलपत्र, तर दुसर्‍या चरणावर तुळशीपत्र दिसले. तेव्हा माझ्या मनात ‘मला असे का दिसत आहे ?’, असा विचार आला आणि लगेच ‘हर-हरि एकच आहेत’, असे लक्षात येऊन ‘ते माझे गुरुदेव आहेत’, याची मला जाणीव झाली.

३. डोळ्यांतून भावाश्रू वहात असतांना ते थंडगार असणे

त्यानंतर माझा भाव दाटून आला आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहायला लागले. माझ्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू थंडगार होते.

प्रत्येक क्षणी देव आपल्याला जाणीव करून देत असतो, ‘गुरु हेच आपले अंतिम ध्येय आहे. गुरु हेच आपले पालनहार आहेत आणि ते आपल्याला या घोर आपत्काळात तारून नेणार आहेत.’ गुरुमाऊली, तुम्ही परम कृपाळू आहात. मला ही अनुभूती दिल्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’

– सौ. स्नेहा गिरीश पुजारी, मिरज (२०.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक