मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती !
मुंबई – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस आयुक्त पदावर असलेले हेमंत नगराळे यांचे राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्थानांतर करण्यात आले आहे. यापूर्वी संजय पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभारही सांभाळला आहे. भारतीय पोलीस सेवेतील वर्ष १९८६ मधील ते अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात पोलीस विभागात विविध अधिकारपदांचा कार्यभार सांभाळला आहे.