राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्यावर ‘ईडी’ची धाड !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकून १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता कह्यात घेतली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वर्ष २०१९ मध्ये आर्थिक अपहाराच्या प्रकरणी प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर त्यांच्या साखर कारखान्यांची चौकशी करण्यात आली होती. हा साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून नाममात्र दरात तनपुरे यांच्याशी संबंधित आस्थापनाने विकत घेतल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने राम गणेश गडकरी नावाच्या या साखर कारखान्याची ९० एकर, तसेच अन्य ४.६ एकर भूमी कह्यात घेतली आहे.