अल्पवयीन मुलीचे धर्मांतर केल्याने ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेला उच्च न्यायालयाची नोटीस
मुलीचे ५ मास लैंगिक शोषण
|
नवी देहली – ‘इव्हेंजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया कमिशन ऑन रिलीफ अँड प्रयास’ नावाच्या ख्रिस्ती मिशनरी संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एका महिलेच्या अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करणे आणि तिच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचा खोटा गुन्हा नोंदवणे, यांप्रकरणी देहली उच्च न्यायालयाने या संस्थेला नोटीस पाठवली आहे.
Delhi HC issues notice in plea filed by mother alleging indoctrination, forced conversion of her minor child by Christian missionary NGOs: Detailshttps://t.co/ChurJ4IJgN
— OpIndia.com (@OpIndia_com) February 26, 2022
या महिलेने सांगितले की, मला कुठलीही माहिती न देता माझ्या मुलीचे धर्मांतर केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्याकडून पोलिसांत लैंगिक शोषणाची खोटी तक्रार करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या मुलीला ‘चाईल्ड केयर इन्स्टिट्यूशन’कडे सोपवले होते. या संस्थेकडे मुलीला सोपवणे अवैध होते. या संस्थेमध्येच तिचे ५ मास लैंगिक शोषण करण्यात आले.