जागतिक स्तरावरील ‘बोल्ट्झमन’ पुरस्कार डॉ. दीपक धर यांना घोषित !
पुणे – विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील ‘बोल्ट्झमन’ पुरस्कार सांख्यिकीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित झाला आहे. त्यांच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा मान मिळत आहे. दर ३ वर्षांनी ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अॅप्लाईड फिजिक्स’ या संस्थेच्या ‘स्टॅटेस्टीकल कमिशन’द्वारे हा पुरस्कार घोषित करण्यात येतो.
भौमितिक रचनांची कार्यप्रणाली (फ्रॅक्ट्रल्स), स्व संघटित क्लिष्ट रचना, प्राण्यांशी निगडित संख्याशास्त्रीय समस्या, चुंबक आणि काचेमधील पालटणार्या रचनांचा संख्याशास्त्रीय अभ्यास, हे डॉ. धर यांचे वैशिष्ट्य आहे. डॉ. धर सध्या ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे’ (आयसर) येथे भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.