राजकारण न करता शेतकर्यांच्या उसाचे गाळप करा !
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या साखर कारखानदार प्रशासनातील अधिकार्यांना सूचना
बीड – यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखान्याने राजकारण न करता शेतकर्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत न्यायला हवा, अशी भूमिका बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. साखर कारखानदार प्रशासनातील अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी प्रशासनातील अधिकार्यांना सूचना दिल्या.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, येत्या काळात अनेक निवडणुका आहेत, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी तिथे राजकारण निश्चित करावे; परंतु शेतकर्यांना वेठीस धरू नये, यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने समन्वय साधून साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस गाळपाच्या सूचना द्याव्यात.