सैनिकांसाठी आता ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करता येणार नाही !

भारतीय सैन्याकडून सूचना

मृत्यूमुखी पडणार्‍या सैनिकांसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करणे चुकीचे

नवी देहली – युद्धात मृत्यूमुखी पडणार्‍या सैनिकांसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ शब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. सैन्याच्या काही अधिकार्‍यांकडून, तसेच प्रसारमाध्यमांकडून सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर केला जातो. ज्यांनी देशासाठी बलीदान दिले आहे, ज्या व्यक्तीने धर्मिक किंवा राजकीय आस्था, विचारांसाठी प्राण गमावले आहेत, अशा व्यक्तींसाठी ‘शहीद’ किंवा ‘हुतात्मा’ हा शब्द वापरला जातो. त्यामुळे भारतीय सैनिकांसाठी ‘शहीद’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे, असे भारतीय सैन्याने म्हटले आहे. भारतीय सैन्याच्या मुख्यालयाने त्याच्या सर्व कमांडला पत्र लिहून याविषयीची सूचना दिली आहे.

भारतीय सैन्याच्या मुख्यालयाकडून वीर सैनिकांसाठी पुढील शब्द वापरण्याची सूचना

१. किल्ड इन अ‍ॅक्शन (कारवाईत मारले गेले)
२. लेड डाउन देअर लाइफ (प्राणांचे बलीदान केले)
३. सुप्रिम सेक्रिफाइस फॉर नेशन (देशासाठी दिले सर्वोच्च बलीदान)
४. फॉलन हीरोज (वीरगतीला प्राप्त)
५. इंडियन आर्मी ब्रेव्स (भारतीय सेनेचे वीर)
६. फॉलन सोल्जर्स (युद्धात कामी आले)