बनावट कागदपत्रांद्वारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व अन् जामीन मिळवून देणार्या धर्मांधाला अटक
मूळचा म्यानमारच्या असलेल्या धर्मांधाने भारतीय नागरिकत्व मिळवले !
बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यामागे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही उत्तरदायी आहेत. अशांना शोधून त्यांच्यावर देशद्रोहाच्या अंतर्गत कठार कारवाई करणे आवश्यक ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवून देणार्या महंमद रफीक उपाख्य रफीक उल् इस्लाम याला येथील रेल्वे स्थानकावरून आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.
यूपी ATS ने बांग्लादेशी नागरिकों और रोहिंग्या को जाली दस्तावेजों से भारतीय नागरिकता दिलाने और मानव तस्करी रैकेट से जुड़े सक्रिय सदस्य को गिरफ्तार किया.#UttarPradesh (@aap_ka_santosh)https://t.co/SPBiKwxlep
— AajTak (@aajtak) February 27, 2022
रफीक कारागृहात अटकेत असणार्या रोहिंग्या मुसलमानांना जामीनही मिळवून देत होता. तो मूळचा म्यानमारमधील रहाणारा आहे. अवैधरित्या भारतीय सीमा ओलांडून तो बंगालच्या नदिया जिल्ह्यात रहात होता. त्याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवले होते. तो भाग्यनगर येथील मांस कारखान्यात काम करत होता. तेथे तो नूर याच्या संपर्कात आला. त्यानंतर तो बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळवून देणे आणि जामीन मिळवून देण्याचे काम करू लागला. त्याला प्रत्येक जामीनासाठी १५ ते २० सहस्र रुपये मिळत होते.