स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सांगली येथे अभिवादन !
कोल्हापूर, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
१. कोल्हापूर येथे ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ’ यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती श्री. नितीन वाडीकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष श्री. श्रीरंग कुलकर्णी, सर्वश्री राजेंद्र शिंदे, साईप्रसाद बेकनाळकर, विकास परांजपे, अविनाश धर्माधिकारी, मालोजी केरकर, सौ. मनिषा वाडीकर यांसह अन्य उपस्थित होते. या वेळी सावरकर साहित्याच्या अभ्यासक कु. क्षितिजा जोशी यांनी ‘भारताचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची राष्ट्रनिष्ठा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
२. सांगली येथे ‘चित्पावन परिवार सांगली’ या संस्थेच्या वतीने चित्पावन कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष श्री. वामन बर्वे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके, सर्वश्री गिरीश परचुरे, विनायक कुननूर, बाळासाहेब पोतदार उपस्थित होते.
३. सांगली येथे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार श्री. सुधीर गाडगीळ, संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने, सर्वश्री श्रीकांत तात्या शिंदे, नगरसेवक सर्वश्री संजय कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, विनायक सिंहासने यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.