दिशा सालियन मृत्यूप्रकरणी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
मुंबई – दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे दिशा हिची अपकीर्ती झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी मालवणी पोलीस ठाण्यात केली असून या प्रकरणी नारायण राणे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Parents of Disha Salian file case against union minister Narayan Rane and his MLA son Nitesh Rane for alleging that Disha was raped and murderedhttps://t.co/pXowJNbcuG
— OpIndia.com (@OpIndia_com) February 27, 2022
दिशा सालियन हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांनी महिला आयोगाला सादर केला आहे. या अहवालानुसार दिशा हिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे, तसेच ती गरोदरही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी मुलीची नाहक अपकीर्ती केली जात असल्याचे दिशा हिच्या पालकांनी तक्रारीत म्हटले असून राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.