युक्रेनवासियांना ‘इस्कॉन’चे साहाय्य !

हिंदु धर्माचे पालन करणारे जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी ते निस्पृहपणे इतरांना साहाय्य करतात; मात्र ख्रिस्ती धर्मप्रचारक साहाय्य करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करतात ! भारतातील निधर्मीवादी हे जाणतील तो सुदिन ! – संपादक 

‘इस्कॉन’चे कोलकाता येथील उपाध्यक्ष राधारमण दास (छायाचित्र सौजन्य : ANI) 

कोलकाता – युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यानंतर तेथील अनेक नागरिकांच्या साहाय्यासाठी ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘देशातील गरजू नागरिकांना साहाय्य करण्यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत. संकटात असलेल्या नागरिकांना साहाय्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत’, अशी माहिती ‘इस्कॉन’चे कोलकाता येथील उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली.


इंग्रजीत म्हण आहे, ‘आयुष्य तुम्हाला लिंबू देते, तेव्हा लिंबूपाणी बनवा.’ इस्कॉनचे भक्त तर याच्या एक पाऊल पुढे असून ‘जेव्हा आयुष्य त्यांच्यावर लिंबू फेकते, तेव्हा ते लिंबूपाणी बनवतातच, त्यासह ते इतरांनाही देतात. युक्रेनमध्ये आमचे भक्त स्वतःचा जीव धोक्यात घालून तेथील गरजू लोकांना साहाय्य करत आहेत, अशी माहिती राधारमण दास यांनी दिली. राधारमण दास पुढे म्हणाले, ‘‘कीवमधील आमच्या भक्तांविषयी माहिती मिळाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ते सर्व सुरक्षित असून आमची ५४ मंदिरेही सुरक्षित आहेत.’’ वर्ष २००० मध्ये चेचन्या युद्धाच्या वेळीही ‘इस्कॉन’च्या भक्तांनी गरजू लोकांना साहाय्य केले होते. हे साहाय्य करतांना अनेक भक्तांनी प्राण गमावले होते.