एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना कु. मधुरा भोसले यांच्या खोलीतील शिवाच्या चित्राची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
सनातनची साधिका कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या खोलीत शिवाचे सनातन-निर्मित चित्र आहे. ‘या चित्राकडे पाहून काय जाणवते ?’, यासाठी हे चित्र रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात सूक्ष्म परीक्षणासाठी ठेवण्यात आले होते. त्या वेळी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना शिवाच्या चित्राची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ‘चित्राकडे पहातांना भावजागृती होत होती. चित्रातील शिवाच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर उच्च स्तरीय शांतीची अनुभूती आली.
२. चित्राजवळून गेले, तरी आपल्याला त्यातील चैतन्याची अनुभूती येऊ शकते. म्हणजे ‘ते चैतन्य प्रकाशाच्या रूपात जाणवून तो प्रकाश सभोवताली प्रक्षेपित होत आहे’, असे मला वाटले.
३. शिवाच्या चित्रात जिवंतपणा आला असून शिव श्वासोच्छ्वास करत असल्याचे मला जाणवले.
४. चित्राचा स्पर्श मृदू, गुळगुळीत जाणवला. चित्रातील शिवाच्या पोटाला स्पर्श केल्यावर पोट मृदू जाणवून त्याची हालचाल जाणवली.
५. चित्रात शिवाच्या डोक्याभोवती पांढरी प्रभावळ असून ती पुष्कळ तेजस्वी झाली आहे.
६. साधिकेचा भाव चांगला असल्याने शिवाच्या चित्रात जिवंतपणा आला असून चित्राच्या रंगातही पालट झाला आहे.’
– ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संत (पू.) सौ. योया वाले, युरोप (१५.१०.२०१५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |