गुरूंनी दिले आम्हा चैतन्याचे धन ।
आज असलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी सर्व साधकांचे कोटीशः प्रणाम !
‘सकाळच्या रामप्रहरी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेल्या मार्गदर्शनातून त्यांनीच लिहून घेतलेले कविता पुष्प त्यांच्या चरणी अर्पण !
गुरूंनी (टीप १) दिले आम्हा चैतन्याचे धन ।
महाराज (टीप २) म्हणती, चैतन्य हाची देव ।। १ ।।
चैतन्य असे जिवाचे जीवन ।
चैतन्यची शब्द, चैतन्यची अन्न ।
चैतन्याचा गौरव, चैतन्याचे पूजन ।
साध्य आणि साधन आहे चैतन्यच ।। २ ।।
गुरुकृपायोगे काढा काळे आवरण ।
चैतन्यच आहे जगण्याचे साधन ।
मग प्रगटेल कणाकणातून चैतन्य ।
आनंदाच्या डोही बुडवेल चैतन्यच ।। ३ ।।
चैतन्यच धर्म, चैतन्य करी कर्म ।
चैतन्याचे चिंतन, चैतन्याचा सत्संग ।
चैतन्याचे स्वागत, चैतन्याचा सन्मान ।
निराधाराचा आधार आहे चैतन्यच ।। ४ ।।
चैतन्याला असते अमृताची गोडी ।
दुःखाला असते चैतन्याचे वावडे ।
चैतन्याचे दारी, उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।। ५ ।।
चैतन्यच अणू, चैतन्य रेणू ।
चैतन्यच झाला कृष्णाचा वेणू ।
चैतन्याचे नाव आहे परम पूज्य (टीप १) ।
ओसंडून वाहे चरणांतून चैतन्यच ।। ६ ।।
चैतन्य मंत्र, चैतन्यच अस्त्र ।
चैतन्य करील रज-तमाचा नाश ।
चैतन्यच हिंदूंना दाखवी साधनेची वाट ।
चैतन्यानेच होईल हिंदु राष्ट्राची पहाट ।। ७ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – परात्पर गुरु पांडे महाराज
इति गुह्यतमं शास्त्रम्, परात्पर गुरु पांडे महाराज उवाच ।
अर्थ : हे अत्यंत गहन शास्त्र परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितले. हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणकमलांवर अर्पण होवो !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कमलचरणी अर्पणमस्तु ।।
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.६.२०१८)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |