मुसलमानाची हत्या झाली असती, तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते ! – भाजपचे आमदार बसवगौडा यत्नाळ
यत्नाळ यांनी हर्ष यांच्या घरी जाऊन घेतली कुटुंबियांची भेट !
शिवमोग्गा (कर्नाटक) – हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते हर्ष यांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्य शोकाकूल झाले आहे. हत्या करणार्यांना फासावर लटकवले नाही, तर हिंदु युवकांच्या हत्या होतच रहातील. हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या हत्येमागे पुष्कळ मोठे षड्यंत्र आहे. केरळच्या सीमाभागातून शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली. महिलांना पुढे करून अशी कृत्ये केली जात आहेत. काँग्रेसचे कुणीही हर्ष यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले नाहीत. एखाद्या मुसलमानाची हत्या झाली असती, तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघे जण त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले असते, असे विधान भाजपचे आमदार बसवगौडा पाटील यत्नाळ यांनी केले. ते हर्ष यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले. या वेळी त्यांनी हर्ष यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे साहाय्य केले.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करा !
यत्नाळ पुढे म्हणाले की, सामाजिक माध्यमांतून धर्मांध उघडपणे हिंदूंना आव्हान देतात. हे पोलिसांनी रोखाणे आवश्यक आहे. हर्ष यांच्या हत्येचे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवण्यात यावे. हिंदुत्वासाठी कृती करणेे आम्ही शेवटपर्यंत चालूच ठेवू. अशा घटना रोखण्याचे कार्य आम्ही करू. हर्ष यांची हत्या राज्यात शेवटची हत्या ठरू देत. अशी प्रकरणे घडणार नाहीत, याकडे आवर्जून लक्ष देऊ.