मिरज येथे २८ फेब्रुवारी या दिवशी विश्वशांतीसाठी १० लाख नामजपाचा संकल्प !
मिरज, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – येणार्या भीषण आप्तकाळात तरून जाण्यासाठी आणि विश्वशांतीसाठी मिरज येथील माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ५ ते रात्री ७ वाजेपर्यंत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे. तरी ‘ब्राह्मणपुरी येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिर येथे होणार्या या नामजपात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.