नाशिक येथील डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह संशयित आरोपीने सॅनिटायझरने जाळला !
नाशिक – येथील महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह सॅनिटायझर टाकून जाळण्यात आला आहे, अशी माहिती त्यांचा पती आणि संशयित आरोपी संदीप वाजे याचा मावसभाऊ बाळासाहेब उपाख्य यशवंत मस्के याने पोलिसांना दिली आहे; मात्र खून कसा केला ? याविषयी माहिती मिळालेली नाही.
मस्के याने पोलिसांना घटनास्थळावर सॅनिटायझरचा ५ लिटरचा कॅन दाखवला. दुसरा कॅन संदीप याच्या गाळ्यात ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मस्के याने स्वत:च्या पत्नीला सोडण्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, तसेच ‘डॉ. सुवर्णा यांचा छळ कर म्हणजे ती आत्महत्या करेल’, असे मस्के याने संदीपाला सांगितले होते.