नील सोमय्या यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव
मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नील यांच्यावर ४०० कोटी रुपयांची भूमी ४ कोटी ५० सहस्र रुपयांना विकत घेतली असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
नील यांच्या मालकीच्या ‘निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन’मध्ये पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. सोमय्या यांनी एका प्रकल्पासाठी वरील भूमीचा व्यवहार केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.