मनीषाताई अहंशून्यता आणि गुरूंप्रती भावभक्ती यांचे प्रतीक असती ।

सौ. मनीषा पाठक

‘काही वर्षांपूर्वी मी सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना हिंदु जनजागृती समितीच्या सेवेअंतर्गत संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी एका साधिकेला माझ्याशी समन्वय करण्यास सांगितले होते. ती साधिका परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करत होती. यातून ‘मनीषाताई साधकांना चांगल्या पद्धतीने घडवत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. त्या काही मासांपूर्वी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो. तेव्हा मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, आपलेपणा, मनमोकळेपणा, मनाची निर्मळता, तीव्र शारीरिक त्रास असतांनाही आनंदी रहाणे, अहंशून्यता, समष्टी सेवेची तळमळ, गुरूंप्रती भाव’ इत्यादी दैवी गुण लक्षात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी पुढील कवितारूपी शुभेच्छापुष्प अर्पण करत आहे.

पू. शिवाजी वटकर

मनीषाताई तीव्र शारीरिक अन् आध्यात्मिक त्रासांतही आनंदी रहाती ।
तळमळीने सर्वांकडून व्यष्टी अन् समष्टी साधना करवून घेती ।। १ ।।

ताई सनातनच्या आदर्श अध्यात्मप्रसारक शोभती ।
कुटुंबीय, साधक, बालक, वयस्कर यांचा त्या आधार असती ।। २ ।।

तत्त्वनिष्ठ राहूनी साधकांना त्यांच्या चुका सांगती ।
साधकांना स्वभावदोषांसह स्वीकारूनी त्यांना प्रेमाने घडवती ।। ३ ।।

तळमळ, भाव, भक्ती अन् श्रद्धा ठेवूनी ताई साधना करती ।
साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊनी समष्टीची घडी बसवती ।। ४ ।।

ताई स्वतःस परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांचा धूलीकण समजती ।
ताई अहंशून्यता अन् गुरूंप्रती भावभक्ती यांचे प्रतीक असती ।। ५ ।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.२.२०२२)