परम पूज्य हे नाम आळवितो आम्ही गुरुराया… आम्ही गुरुराया ।
मोक्षपदाची वाट दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परम पूज्य हे नाम आळवितो आम्ही गुरुराया…
आम्ही गुरुराया ।
शरण तुम्हाला आलो, आम्ही सोडून ती माया ।। धृ. ।।
मायेचा हा विशाल सागर खुणावतो मज नित्य निरंतर ।
चकवून त्याला आलो, आलो तव चरणा… ।। १ ।।
जिवा-शिवाची भेट घडवूनी, अज्ञानाच्या अंधारातूनी ।
मार्ग मज दावा…, मार्ग मज दावा । गुरुकृपेच्या सामर्थ्याने मुक्त करा या जिवा ।। २ ।।
आज दिवस हा कृतज्ञतेचा, तन-मन-धन अर्पण करण्याचा ।
मानसपूजा करूनी तुमची, पडतो मी पाया ।। ३ ।।
श्रीसत्शक्ति अन् श्रीचित्शक्ति (टीप) असती दोन दिव्य ज्योती ।
त्यांच्यासम आम्हा उजळावे देऊनिया शक्ती ।। ४ ।।
टीप – १३.५.२०२० या दिवशी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले, ‘यापुढे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’, असे संबोधावे.’
– श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा. (२९.५.२०२१)