युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रण
युक्रेनने लढाई थांबवल्यासच चर्चा करू ! – रशिया
कीव (युक्रेन) – रशियाचे सैन्य कीवमध्ये घुसण्याच्या सिद्धतेत असतांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेेलेंस्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले आहे. युक्रेनच्या या प्रस्तावावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी ‘युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवल्यासच आम्ही चर्चा करू’, असे म्हटले आहे. रशियाचे सैन्य ईशान्य आणि पूर्वेकडून युक्रेनची राजधानी कीवजवळ पोचले आहे.
#BREAKING Russia ready to talk if Ukraine army ‘lays down arms’: foreign minister Lavrov pic.twitter.com/0c74ciKqUS
— AFP News Agency (@AFP) February 25, 2022
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा पुतिन यांना दूरभाष !
China’s President Xi Jinping said he supported solving the Ukraine crisis through talks in a call with Russian President Vladimir Putin, state media said Friday, after Moscow launched an invasion of its neighbour.
Read More: https://t.co/7pQHPraN01#ukrainerussia#DailyTribune
— Daily Tribune (@tribunephl) February 25, 2022
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना दूरभाष केला आहे. युक्रेनशी वाटाघाटी करण्याचे आवाहन जिनपिंग यांनी पुतिन यांना केले आहे.