तमिळनाडूच्या मंदिरातून १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली भगवान हनुमानाची प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणणार

१० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली भगवान हनुमानाची प्राचीन मूर्ती

नवी देहली – तमिळनाडू राज्यातील एका मंदिरातून १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली भगवान हनुमानाची प्राचीन मूर्ती ऑस्ट्रेलियामध्ये सापडली असून ती आता भारतात परत आणण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. ही मूर्ती कांस्य धातूची आहे. ९ एप्रिल २०१२ या दिवशी तमिळनाडूतील अरियालुर जिल्ह्यातील वेल्लूर गावातील वर्धराजा पेरूमल मंदिरातून ही मूर्ती चोरण्यात आली होती. वर्ष २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये या मूर्तीची २९ लाख रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला होता. लिलाव करणार्‍यांना आणि ही मूर्ती विकत घेणार्‍याला ही मूर्ती चोरीची असल्याचे ठाऊक नव्हते.