चीनने रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले !

बीजिंग – युक्रेनवरील आक्रमणावरून एकीकडे अमेरिका, ब्रिटन, तसेच युरोपीय देश यांच्याकडून रशियावर निर्बंध लादण्याच्या हालचाली चालू असतांना चीनने मात्र रशियाचा गहू आयात करण्यावर घातलेले निर्बंध उठवले आहेत. ८ फेब्रुवारी या दिवशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्यात झालेल्या कराराचा एक भाग म्हणून हे पाऊल उलण्यात आल्याची मखलाशी चीनने केली आहे. तथापि चीनची ही कृती म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे सरळसरळ समर्थन असल्याचे बोलले जात आहे. रशिया हा जगातील सर्वांत मोठा गहू उत्पादक देश आहे; परंतु ‘बॅक्टेरिया’मिश्रित गव्हाच्या भीतीने चीनने रशियाचा गहू आयात करण्यावर निर्बंध घातले होते.