(म्हणे) ‘तमिळनाडूमध्ये भाजपला रोखायचे असल्यास लोकांचे धर्मांतर आवश्यक !’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे चांगले प्रदर्शन केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्या पुरोगामी लेखिकेला पोटशूळ !

  • तमिळनाडूत सत्ताधारी द्रमुक पक्ष हा हिंदुद्वेषी असल्यामुळे हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार वाढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक 
  • हिंदूंवर आघात करू पहाणार्‍यांना वैध मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूसंघटन अपरिहार्य ! – संपादक 
शालिन मारिया लॉरेन्स : तमिळनाडूमधील स्वयंघोषित ख्रिश्चन कार्यकर्त्या आणि लेखिका

चेन्नई – कथित पुरोगामी लेखिका शालीन मारिया लॉरेन्स यांनी ‘फेसबूक’वर ‘तमिळनाडूमध्ये भाजपची ‘वाढ’ रोखायची असेल, तर लोकांचे धर्मांतर करणे आवश्यक आहे’, असे मत प्रदर्शित केले आहे. शालीन लॉरेन्स यांना सत्ताधारधारी द्रमुकच्या समर्थक म्हणूनही ओळखले जाते.

त्यांनी लिहिले, ‘तमिळनाडूमध्ये घटनाकार डॉ. आंबेडकर यांचे विचार घरोघरी पोचवणे आवश्यक आहे. राज्यात सांस्कृतिक पालट आणि इतिहासाचे पुनर्लेखन केले, तरच धार्मिक कट्टरतावाद्यांच्या कारवायांना चाप बसेल.’ तमिळनाडूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या वेळी भाजपने ३०० हून अधिक जागांवर विजय मिळवला. तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.