मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कंत्राटदारांकडून घेतलेली टक्केवारी बनावट आस्थापनांच्या माध्यमातून इतरत्र वळवायचे ! – किरीट सोमय्या, भाजप
मुंबई – मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संयुक्त अरब अमिराती येथे बनावट आस्थापन स्थापन केले होते. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक कंत्राटातील ४० टक्के पैसे ते रोख घ्यायचे. हेच पैसे बनावट आस्थापनांच्या माध्यमातून ते इतरत्र वळवले जायचे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केला. यशवंत जाधव यांच्या व्यवहारांचा पुरावा आयकर विभागाच्या हाती लागला असल्याचे या वेळी सोमय्या यांनी म्हटले.
यशवंत जाधवांची UAE मध्ये बेनामी कंपनी; काळ्या पैशातून मुंबईतील अनेक जुन्या इमारती विकत घेतल्या: सोमय्या https://t.co/ihXpdPNohC#KiritSomaiya #YashwantJadhav #BMC #BJP #Shivsena #incometax
— Maharashtra Times (@mataonline) February 25, 2022
या वेळी किरीट सोमय्या म्हणाले,
१. यशवंत जाधव कंत्राटदारांकडून मिळणारे रोख पैसे ‘प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून इतरत्र वळते करायचे. हे आस्थापन बंद पडले होते; मात्र या आस्थापनाच्या अधिकोषातील खात्यामध्ये पैसे टाकून त्याचे धनादेश यशवंत जाधव मिळवत असत.
उद्धव ठाकरे-सोनिया गांधी यांची ‘इथंही’ आघाडी; एकाच हवाला ऑपरेटरला पैसे देत असल्याचा आरोप https://t.co/uS3b7MUiWI
— Aapla Maharashtra Media (@AaplaMedia) February 25, 2022
२. उदयशंकर महावार हे (हवाला ‘ऑपरेटर’) सगळे आर्थिक व्यवहार करून देत होते. ते ठाकरे आणि गांधी या दोन्ही परिवारांसाठी काम करायचे. कदाचित सोनिया गांधी यांनीच उद्धव ठाकरे यांना उदय महावार यांची ओळख करू दिली असेल.
(सौजन्य : Mumbai Tak)
३. यशवंत जाधव त्यांना पैसे देऊन त्या बदल्यात धनादेशाच्या स्वरूपात पैसे घेत असत. यशवंत जाधव यांनी अनेक आस्थापने स्थापन केली होती. आयकर खात्याच्या हाती या सगळ्या व्यवहारांचे पुरावे लागले आहेत.
४. उदयशंकर महावार यांनी यशवंत जाधव यांच्याकडून पैसे घेऊन अधिकोषात भरून त्यांना धनादेश देत असल्याचे मान्य केले आहे. यापैकी काही पैसा ‘युएई’ (संयुक्त अरब अमिराती)ला पाठवण्यात आला होता.
५. अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग, कंपनी मंत्रालय आणि निवडणूक आयोग आम्ही सगळे अनेक दिवसांपासून याचा पाठपुरावा करत होतो.
६. यशवंत जाधव यांनी मुंबईतील जुन्या इमारती किती विकत घेतल्या आहेत, त्याची सूची समोर आल्यास शिवसेनेचे नेते किती मोठे माफिया आहेत, हे सगळ्यांना कळेल. यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुंबईकरांना लुटले.
७. यशवंत जाधव बनावट आस्थापनांच्या माध्यमातून पुष्कळ मोठे ‘रॅकेट’ चालवत होते. मी महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ (‘वाईट १२’) नेत्यांची नावे घोषित केली त्यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्याही नावांचा समावेश झाला आहे.