मुंबईमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवल्याचे प्रकरण
मुंबई – सार्वजनिक ठिकाणी तलवार उंचावून दाखवल्याप्रकरणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेचा जल्लोष करण्यासाठी मोहित कंबोज यांच्या घराच्या बाहेर २३ फेब्रुवारी या दिवशी भाजपचे कार्यकर्ते जमले होते. त्या वेळी कंबोज यांनी मान्यातून तलवार काढून हात उंच करून दाखवली होती.