उद्योजक प्रवीण राऊत यांच्या निकटवर्तियांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड !
मुंबई – उद्योजक प्रवीण राऊत यांच्या ठाणे आणि रायगड येथील निकटवर्तियांच्या मालमत्तेवर २३ फेब्रुवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली आहे. ही धाड टाकण्यासाठी देहली येथील अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आले होते. प्रवीण राऊत सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत. गोरेगाव येथील भूखंडाच्या व्यवहारामध्ये पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाप्रकरणी अंमलजबावणी संचालनालयाने प्रवीण राऊत यांना अटक केले आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.