अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचे त्यागपत्र घ्यावे !
सोलापूर येथे भाजपच्या वतीने आंदोलन
सोलापूर, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आल्यानंतर ‘त्यांचा राजीनामा घ्यावा’ या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘आतंकवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असणार्या नवाब मलिकचा धिक्कार असो’, ‘देश का गद्दार कौन, नवाब मलिक…, नवाब मलिक…’ ‘नवाब मलिक.. राजीनामा द्या’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या नवाब मलिक यांचा निषेध असो’ अशा घोषणा भाजपच्या वतीने या वेळी देण्यात आल्या.
या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘देशाचा शत्रू दाऊद इब्राहिमला पैसे पुरवण्याचे काम नवाब मलिक यांनी केले असून या प्रकरणी त्यांना अटक झाली आहे, त्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी या वेळी केली.