व्हॉट्सअॅप गटातील आक्षेपार्ह संदेशासाठी गटाचा निर्माता (ग्रुप अॅडमिन) उत्तरदायी असू शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय
थिरूवनंतपूरम् (केरळ) – व्हॉट्सअॅप गटातील आक्षेपार्ह संदेशासाठी त्या गटाचा निर्माता (ग्रुप अॅडमिन) उत्तरदायी असू शकत नाही, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी दिला.
Admin Of WhatsApp Group Not Vicariously Liable For Objectionable Post By Group Member In The Absence Of A Statutory Provision : Kerala High Court https://t.co/6rZQoNOrL1
— Live Law (@LiveLawIndia) February 24, 2022
१. मार्च २०२० में ‘फ्रेंड्स’ नावाच्या एका व्हॉट्सअॅप गटाने एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यात लहान मुले शारीरिक संबंधांमध्ये सहभागी असल्याचे दाखवण्यात आले होते. हा गटाच्या निर्माता (अॅडमिन) तथा याचिककर्त्याने बनवला होता, तसेच त्याच्यासह अन्य दोघेजणही या गटाचे निर्माते (अॅडमिन) होते. यातील एक जण आरोपी होता. त्यानंतर याचिकाकर्ता अॅडमिन असल्याने त्यालाही आरोपी बनवण्यात आले होते. यामुळे त्याने न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.
२. न्यायालयाने म्हटले की, गटाच्या निर्मात्याकडे केवळ एखाद्याला गटामध्ये जोडणे किंवा काढणे, इतकाच अधिकार आहे. गटामधील लोक काय प्रसारित करत आहेत, त्यावर त्याचे नियंत्रण नसते. तो कोणत्याही संदेशावर लक्ष ठेवू शकत नाही किंवा त्यात पालटही करू शकत नाही.