सार्वजनिकरित्या आरोप करत असल्यामुळे नवाब मलिक यांच्यावर कारवाई ! – शरद पवार
मुंबई – जे लोक केंद्रशासन किंवा यंत्रणा यांच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, त्यांना त्रास देण्याचा प्रकार चालू आहे. नवाब मलिक हे सार्वजनिकरित्या आरोप करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. भविष्यात असे काहीतरी होईल, याची खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या अटकेनंतर व्यक्त केली.
नवाब मलिक यांच्यावर जी कारवाई होत आहे, यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, त्याचे हे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी दिली आहे.@PawarSpeaks@nawabmalikncp pic.twitter.com/BZAGtJdyrx
— NCP (@NCPspeaks) February 23, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ट्विटर’ खात्यावरून शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.