खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणार्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक !
घुसखोर धर्मांध बांगलादेशींना गेली अनेक वर्षे आश्रय दिल्याचा परिणाम ! – संपादक
नवी मुंबई – खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणार्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. फराहत शेख, अमिसल खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर मुंबई, नवी मुंबई आणि गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यात घरफोडी अन् मंदिरात चोरी करण्याचे गुन्हे नोंद आहेत.
३१ जानेवारीच्या रात्री इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी ओवागाव कॅम्प परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वरील २ बांगलादेशी चोरट्यांना अटक करण्यात आली. हे आरोपी लपून छपून बांगलादेश-भारत सीमा रेषेवरून भारतात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींवर पारपत्र अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.