सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – कु. शिवलीला गुब्याड, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन ‘शौर्यजागृती’ व्याख्यान

कु. शिवलीला गुब्याड

रत्नागिरी, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अफझलखानाचा वध करून आतंकवाद संपवला आणि स्वराज्यात सुरक्षितता अधिक बळकट केली. तसेच अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या प्राणाचे बलीदान देऊन इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज संपूर्ण देशात महिला आणि युवक यांची स्थिती अत्यंत विदारक होत चालली आहे. ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्यांनी समाजाला सुरक्षितता मिळवून दिलेली नाही. याउलट भ्रष्टाचार आणि अत्याचार यांसारखी असंख्य संकटे समाजासमोर उभी करून ठेवली आहेत. या देशातील प्रत्येक व्यक्ती असुरक्षितेचा अनुभव घेत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. शिवलीला गुब्याड यांनी केले. २२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रत्नागिरी येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित केलेल्या ऑनलाईन ‘शौर्यजागृती’ व्याख्यानात त्या बोलत होत्या. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. मुक्ता भारद्वाज यांनी केले, तर व्याख्यानाचा उद्देश कु. सुवर्णा सकपाळ यांनी मांडला.

कु. शिवलीला गुब्याड पुढे म्हणाल्या की,

१. लहान वयाच्या मुलींपासून ९० वर्षांच्या आजीपर्यंतच्या महिला ‘बलात्कार’ या समस्येने पीडित आहेत.

२. साध्या कारणामुळे आत्महत्या करणार्‍या युवा पिढीला आज मानसिक, तसेच शारीरिक सक्षमीकरण करण्याची आवश्यकता आहे.

३. स्वतः तसेच समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आयोजित स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी व्हा.