युक्रेनच्या नागरिकांनी रशिया तातडीने सोडावे ! – युक्रेन

युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी लागू होणार !

कीव (युक्रेन) – रशिया-युक्रेन या देशांमधील सीमावाद विकोपाला गेलेला असतांना आता युक्रेनने रशियामध्ये वास्तव्यास असलेल्या त्याच्या नागरिकांना तातडीने रशिया सोडण्याची सूचना दिली आहे. रशियामध्ये युक्रेनचे तब्बल ३० लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. युक्रेनच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी लागू होणार आहे. यासमवेतच रशियाकडून होणार्‍या संभाव्य आक्रमणाकडे पहाता युक्रेन त्याच्या राखीव सैन्यालाही मुख्य सैन्याशी जोडण्याचा विचार करत आहे.