‘रामसेतु’ला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ मार्चला सुनावणी !
मुळात अशी मागणी करावी लागू नये ! केंद्र सरकारने स्वतःहून अशी घोषण करणे आवश्यक आहे ! – संपादक
नवी देहली – ‘रामसेतु’ला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी करणार्या भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर ९ मार्च या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. डॉ. स्वामी यांनी ८ मार्च २०२१ या दिवशी याचिका प्रविष्ट केली होती.
SC To Hear Plea To Declare ‘Ram Sethu’ National Heritage Monument On March 9https://t.co/2pV6sP4vdK
— Swarajya (@SwarajyaMag) February 23, 2022
डॉ. स्वामी यांनी याविषयी म्हटले की, मी अर्धा खटला यापूर्वीच जिंकलेलो आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच ‘रामसेतु’चे अस्तित्व मान्य केलेले आहे. वर्ष २०१७ मध्ये केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणी बैठकही बोलावली होती; मात्र त्यानंतर काहीच झाले नाही.