टीईटी अपव्यवहारात राज्यातील अपात्र उमेदवारांची जबाब नोंदणी होणार !
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणात अपात्र उमेदवारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १० उमेदवारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. पैसे देऊन पात्र ठरलेल्या राज्यातील ७ सहस्र ८०० उमेदवारांची यादी शिक्षण विभागाकडून पडताळून घेतली आहे. पैसे देऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांनी जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित रहावे, असे पत्र सायबर गुन्हे शाखा पाठवणार आहे. जबाब नोंदवणे ही महत्त्वाची प्रक्रिया असून त्यातून मिळालेल्या माहितीचा अन्वेषणासाठी उपयोग होऊ शकतो.
राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडून शासनाधिन केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पैसे घेऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मिळाली आहे. पात्र ठरलेले किती उमेदवार शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, याविषयीची माहिती घेण्याचे काम शिक्षण विभाग करणार आहे.