मुख्यमंत्री स्वतः मद्य घेत नाहीत, मग जनतेला का वाईन पाजत आहेत ? – रामदास आठवले, केंद्रीयमंत्री
संभाजीनगर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः मद्य घेत नाहीत, मग जनतेला वाईन पाजवण्यासाठी सहज का उपलब्ध करून देत आहेत ? असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री स्वतः दारू घेत नाहीत, मग जनतेला का वाइन पाजताहेत : रामदास आठवले https://t.co/4U57zMe5k2
— Divya Marathi (@MarathiDivya) February 22, 2022
२१ फेब्रुवारी या दिवशी बजाजनगर येथील आम्रपाली बुद्धविहारात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग-व्यवसाय चालू करावा. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजनांच्या माध्यमातून कर्ज मिळते. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.