प.पू. दास महाराज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील आगाशीत आल्यावर तेथे बसलेल्या साधिकेला चंदनाचा सुगंध येणे आणि नंतर तिची कंबरदुखी नाहीशी होणे
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यानंतर तेथील निवासाच्या खोलीची स्वच्छता केली. त्याच्या दुसर्या दिवशी मला कंबरदुखीचा पुष्कळ त्रास होत होता. दुपारी मी आश्रमाच्या तिसर्या माळ्यावरील आगाशीत बसून नामजप करत होते. तेव्हा तेथे प.पू. दास महाराज आले. ते चालण्याचा व्यायाम करत होते. त्या वेळी मला चंदनाचा सुगंध आला. माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना झाली, ‘गुरुदेवा, मला चैतन्य मिळून माझी कंबरदुखी नाहीशी होऊ दे.’ नंतर काही मिनिटांतच माझ्या कमरेतील वेदना न्यून झाल्या आणि नंतर माझी कंबरदुखी नाहीशी झाली. ईश्वराने मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. स्वाती पालव, बोईसर, मुंबई. (१९.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |