वडगाव खुर्द (पुणे) येथील शिवकालीन श्री वडजाईमाता मंदिर येथे उत्सव पार पडला

उत्सवाच्या ठिकाणी मंदिराच्या विश्वस्तांनी सनातननिर्मित ‘देवीपूजनाचे शास्त्र’ लघुग्रंथ वाटप केले !

शिवकालीन श्री वडजाईमातेची मूर्ती

पुणे, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – वडगाव खुर्द येथील शिवकालीन श्री वडजाईमाता मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही १६ फेब्रुवारी या दिवशी उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा, आरती, दुपारी महाप्रसाद आणि सायंकाळी देवीच्या मूर्तीची पालखी असा कार्यक्रम झाला. सिंहगड परिसरातील देवीभक्तांनी मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन आणि महाप्रसाद यांचा लाभ घेतला.

विशेष

१. मंदिराचे विश्वस्त श्री. भरत कुंभारकर यांनी सनातनच्या ‘देवीपूजनाचे शास्त्र (कुंकुमार्चन, ओटी भरणे आदींचे शास्त्र ! )’ या १०० लघुग्रंथांचे वितरण देवीभक्तांना केले. श्री. भरत कुंभारकर हे मागील १० वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. त्यांच्या नातेवाइकांच्या दशक्रीया विधीच्या वेळीही त्यांनी सनातननिर्मित ‘दत्त’ लघुग्रंथ आणि दत्ताच्या स्टिकर नामपट्ट्या नातेवाईकांना वाटल्या होत्या.

२. उत्सवाच्या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.