हर्ष यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’ फेसबूक पानाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद
वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांना दिली होती धमकी !
मंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर ‘मंगळुरू मुस्लिम’ नावाच्या फेसबूक पानावर अवमानकारक पोस्ट प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला आहे. या पोस्टमध्ये हर्ष यांचा उल्लेख ‘शिवमोग्गाच्या गल्लीतला कुत्रा’ असा करण्यात आला आहे.
Plz Answer… @compolmlr@MangaluruPolice@DgpKarnataka
Why there is No action against “Mangalore Muslim FB Page” ?
.. When it issues Fatwas & threats directly.
..Now they are celebrating #Harsha ‘s murder !!#JusticeForHarsha@HMOKarnataka @CTRavi_BJP@TVMohandasPai pic.twitter.com/ZqHTXQoN72— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) February 22, 2022
हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर हे पान काही काळ बंद करण्यात आले होते. आता पुन्हा ते चालू झाले आहे. वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.