(म्हणे) ‘पाकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा ‘हिजाब दिवस’ म्हणून साजरा करावा !’
|
|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात मुसलमान महिलांना हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यास बंदी घातली जात आहे. जागतिक समुदायाचे याकडे लक्ष वेधण्यासठी येत्या ८ मार्चचा प्रस्तावित ‘औरत मार्च’ला (महिलांच्या हक्कांसाठी काढलेल्या मोर्चाला) बंदी घालून त्याऐवजी ‘हिजाब दिवस’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी पाकच्या धार्मिक प्रकरणांचे मंत्री नूरुल हक कादरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून केली आहे. ८ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे.
Pakistan’s Minister for Religious Affairs Noorul Haq Qadri has requested the Prime Minister @ImranKhanPTI to celebrate Hijab Day on March 8, which is celebrated as Women’s day. https://t.co/KqoxCGLGRC
— WION (@WIONews) February 20, 2022
कादरी यांनी म्हटले, ‘वर्ष २०१८ पासून ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ पाकमध्ये ‘औरत मार्च’ म्हणून आयोजित केला जात आहे. असा मोर्चा काढणे हा इस्लामच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. या दिवशी कोणत्याही कार्यक्रमांतून इस्लामची मूल्ये, समाजाचे मानदंड, हिजाब आदींविषयी प्रश्न उपस्थित करणे किंवा त्यांचा अवमान करणे, यासाठी अनुमती दिली जाऊ नये. यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातात.’