(म्हणे) ‘हा देश पाकिस्तान झाला असून सर्व हिंदूंनी देश सोडावा !’
|
|
राजकोट (गुजरात) – येथील सोहिल हुसेन मोर या अधिवक्त्याने शेजारी रहाणार्या हिंदूंना चाकूचा धाक दाखवून देशातून निघून जाण्याची धमकी दिली, तसेच श्रीगणेशाची मूर्तीही फोडली. ही घटना २० फेब्रुवारी या दिवशी घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. मोर याने या वेळी आलेल्या पोलिसांनाही मारहाण केली. (पोलिसांनाह मारहाण करण्याइतपत उद्दाम झालेले धर्मांध ! – संपादक) सोहिल मोर याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे, मारहाण आणि पोलिसांना कर्तव्य बजावण्यात अडथळे आणल्याच्या आरोपावरून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. २० फेब्रुवारीला येथील शामाप्रसाद मुखर्जी नगरात ही घटना घडली. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी सोहिल हुसेन मोर याने त्याच्या निवासी सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद माहिती प्रसारित केली. त्यावर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या एक सदस्य ज्योती सोढा यांनी मोर याला दूरभाष करून अप्रसन्नता व्यक्त केली. तेव्हा संतापलेल्या मोर याने सोढा यांना ‘आता हा देश पाकिस्तान झाला आहे. येथील सगळे नागरिक मुसलमान आहेत. सर्व हिंदूंनी निघून जावे,’ अशी धमकी दिली. पोलिसांनी मोर याला अटक केली आहे.
‘Hindus should leave, this place will become Pakistan’: Rajkot lawyer Sohil Hussain Mor threatens neighbours with knife on Shivaji jayanti
This is majority Hindu secular India(only country for Hindus) where Hindus are asked to leave by Muslims. @kanimozhi
https://t.co/ACg5dNyhZ3— Sanjeev Saini (@spasan03) February 22, 2022
१. किशन बोलिया (भारवाड) याच्या हत्येच्या प्रकरणात पाकिस्तानचा सहभाग दिसून आला. त्यावरून सोहिल मोर म्हणाले की, या समाजाचे पाकिस्तानात रूपांतर होईल आणि सर्व हिंदूंनी येथून निघून जावे. किती काळ तुम्ही मला गप्प ठेवाल, माझ्या पाठीशी मोठे सैन्य आहे.
२. यानंतर सोढा यांनी मोर याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि ‘असे धार्मिक तेढ वाढवणारे, चिथावणीखोर शब्द वापरू नका’ असे सांगितले. त्यावर मोर याने सोढा यांना चाकू दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोर याने आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास चालू केले. तसेच दारावर लावलेल्या तोरणातली श्रीगणेशाची मूर्तीही फोडली. त्यामुळे सोसायटीतल्या सदस्यांनी पोलिसांना पाचारण केले.
३. याविषयी रहिवाशांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘असे विचित्र विधान अशिक्षित व्यक्तीने नव्हे, तर व्यवसायाने अधिवक्ता असलेल्या व्यक्तीने केले आहे. हे धक्कादायक आहे. आतापर्यंत ही व्यक्ती आमच्यासमवेत मिळून मिसळून रहात होती; पण गेल्या काही काळापासून त्याच्या वागण्यात पालट झाला आहे. त्याच्या बोलण्यात कट्टरतावादी शब्द येऊ लागले असल्याचे आम्हाला जाणवले होते. त्याच्या अशा धार्मिक कट्टरतेचा पुरस्कार करणार्या, इतरांविषयी द्वेषाची भावना बाळगण्याच्या टोकाच्या विचारांमागे मोठे जाळे असू शकते.’
पोलिसांकडून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न !
|