कट्टरतावाद्यांनी विरोध केल्यामुळे कुवेतमध्ये महिलांसाठीच्या योगासनांचा कार्यक्रम सरकारकडून रहित
पद्मासन आणि श्वानासन इस्लामसाठी धोकादायक असल्याचा दावा
इस्लामचा प्रमुख देश असणार्या सौदी अरेबियामध्येही आता योगासनांचे कार्यक्रम होऊ लागले असतांना अन्य इस्लामी देश स्वतःला अधिक कट्टर दाखवण्याचा यातून प्रयत्न करत आहेत, हेच यातून लक्षात येते ! – संपादक
कुवेत सिटी (कुवेत) – कुवेत सरकारने येथील महिलांसाठीच्या योगासनांविषयीचा एक कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडले. या कार्यक्रमाचे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर देशातील कट्टरतावादी मुसलमानांनी हा ‘इस्लामचा अवमान’ असल्याचे सांगत त्यास विरोध केला. पद्मासन आणि श्वानासन ही आसने ‘इस्लामसाठी धोकादायक’ असल्याचे कट्टरतावादी सांगत आहेत. त्यामुळे महिलांनी कट्टरतावाद्यांच्या विरोधात कुवेतच्या संसदेबाहेर निदर्शने केली. याविषयी कुवेतमधील महिला कायकर्त्या नजीबा हयात यांनी म्हटले की, कट्टरतावाद्यांच्या अशा विरोधामुळे देश मागे पडत आहे.
‘इस्लाम के लिए खतरनाक है पद्मासन और श्वानासन’: कुवैत की सरकार ने योग शिविर को रोका, मुल्ला-मौलवियों के खिलाफ सड़क पर महिलाएँ#Yoga #Kuwait #Womenhttps://t.co/G0AxOPhTX8
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 21, 2022
कुवेतमध्ये अशा प्रकारचा विरोध केला जात असला, तरी सौदी अरेबियामध्ये जानेवारी २०२२ मध्ये सार्वजनिक ठिकाणी योग महोत्सव आयोजित करण्यात आला होता.