हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका करणार्या विद्यार्थिनीच्या वडिलांच्या उपाहारगृहावर जमावाचे आक्रमण
|
हिजाबच्या सूत्रावरून धर्मांधांनी समाजात तणाव निर्माण केल्यामुळे लोकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी सरकारने धडाडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे ! – संपादक
उडुपी (कर्नाटक) – हिजाबच्या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारी विद्यार्थिनी हाजरा शिफा हिच्या वडिलांच्या उपाहारगृहावर जमावाने २१ फेब्रुवारीच्या रात्री आक्रमण केले. यात हाजरा हिचा भाऊ गंभीररित्या घायाळ झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आक्रमणाची घटना उडुपी येथील मालपे येथे घडली. ‘हे आक्रमण रा.स्व. संघाच्या गुडांनी केले असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी हजरा शिफा हिने केली आहे.
A group of people allegedly belonging to fringe elements launched an attack on a restaurant in Malpe. The restaurant which was attacked belongs to the father of one of the petitioners in the #HijabRow case.@XpressBengaluru https://t.co/zQXBDiYZEd
— The New Indian Express (@NewIndianXpress) February 22, 2022