हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी काशिफ आणि नदीम यांना अटक

  • याचा अर्थ ही हत्या धर्मांधांनीच केली, हे स्पष्ट झाले आहे. आता याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ? – संपादक
  • कर्नाटकमध्ये शरीयतनुसार हिजाब घालण्याची मागणी करणारे आता या खुन्यांना शरीयतप्रमाणे भर चौकात फासावर लटकवण्याची मागणी करतील का ? – संपादक
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष (डावीकडे)

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. तथापि त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. ‘झी न्यूज’च्या ‘डीएन्ए’ या कार्यक्रमात, तसेच ‘इंडिया टुडे’ आणि काही ट्विटर खात्यांवरून यातील दोघांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात एकाचे नाव काशिफ, तर दुसर्‍याचे नदीम असल्याचे सांगितले जात आहे. तिसर्‍याचे नाव मात्र सांगण्यात आलेले नाही. पोलीस अन्य २ जणांचा शोध घेत आहेत.