गेल्या २ वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नांमध्ये १ सहस्र कोटी रुपयांची घट !

पिंपरी (जिल्हा पुणे) – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरालाही आर्थिक फटका बसला आहे. महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असणार्‍या विभागांकडून मिळणारे उत्पन्न मंदावले. उत्पन्न आणि व्यय यांचा ताळमेळ बसत नाही. उत्पन्न अल्प मिळत असून व्यय अल्प होत नाही. त्यामुळे महापालिकेला २ वर्षांमध्ये पालिकेच्या उत्पन्नामध्ये १ सहस्र कोटी रुपयांची घट झाल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.

निधीमुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. मिळकतकर, पाणीपट्टी, बांधकाम अनुमती, जाहिरात परवाना, स्थानिक संस्था कर आणि मुद्रांक शुल्क अशा विविध माध्यमांतून मिळणार्‍या हक्काच्या उत्पन्नांमध्ये घट झाली आहे. २ वर्षांच्या कालखंडानंतर आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली आहे.