संभाजीनगर येथे पूजेच्या नावाखाली साडेपाच तोळे दागिने पळवणार्‍या धर्मांध भोंदू दांपत्याला अटक !

अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ?

अबिद रशीद आणि नगिना खान

संभाजीनगर – पती-पत्नीमधील वाद मिटवण्याची थाप मारत पूजेच्या (विधी) नावाखाली रूमालात ठेवलेले साडेपाच तोळ्यांचे दागिने हातचलाखीने लांबवणार्‍या परप्रांतीय भोंदू जोडप्याला उस्मानपुरा पोलिसांनी १७ फेब्रुवारीच्या रात्री अटक केली. ही कारवाई वाळूज भागात करण्यात आली. अबिद रशीद आणि नगिना खान (दोघेही गाझियाबाद, देहली येथील रहिवासी) अशी त्या भोंदूंची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

१. शाकेरा शेख या कपडे खरेदीसाठी शहागंज भागात आल्या होत्या, तेव्हा त्यांना या भोंदूंचे विज्ञापन दिसले. त्यांनी संपर्क साधल्यावर ‘विधीसाठी दागिने घेऊन या, असे म्हणत उस्मानपुरा येथे बोलावले.

२. शाकेरा तेथे गेल्यावर विधीसाठी भूमीवर एक रूमाल अंथरला. त्यावर शाकेरा यांना दागिने ठेवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी दागिने रूमालात ठेवले. त्या रूमालाला भोंदूंनी गाठ मारली; मात्र त्यापूर्वी हातचलाखीने सर्व दागिने लांबवून रूमालावर तांदूळ आणि धागा ठेवला. ‘तो रूमाल सकाळी घरी गेल्यावर उघडा’, असे सांगितले.

३. त्यानंतर शाकेरा घरी निघून गेल्या. दुसर्‍या दिवशी रूमाल उघडून पाहिले असता त्यात गव्हाच्या पिठाचा गोळा होता. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दोन्ही भोंदू वाळूज भागात आल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी पथकासह जाऊन दोघांना अटक केली.