शिवजयंती साजरी करू न देणार्या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने
ठाणे, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करायची होती; परंतु महाविद्यालयाने अनुमती दिली नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासनाचा निषेध करत २१ फेब्रुवारी या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने महाविद्यालयाच्यासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत लसुने यांची बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात २१ मार्च यादिवशी तिथीनुसार असणारी शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली. ही मागणी महाविद्यालयाच्या प्रशासनाने मान्य केली आहे. या वेळी मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळात बजरंग दलाचे जिल्हा संयोजक करण उल्लेंगल, धर्मप्रसार सहप्रमुख सागर शुक्ल, महाविद्यालय प्रमुख सन्नी पाटील, सुरक्षा प्रमुख दिनेश काळे, दुर्गा वहिनीच्या कार्यकर्त्या काजल धरोलिया, तेजस शुक्ल उपस्थित होते.