सनातनचा बालसाधक कु. अर्णव कुलकर्णी याच्या जन्मदिनानिमित्त नू.म.वि. मराठी शाळेस सनातन संस्थेचे बालसंस्कार मालिकेतील ग्रंथ भेट !
सोलापूर, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील नू.म.वि. मराठी शाळेत इयत्ता ४ मध्ये शिकणारा सनातन संस्थेचा बालसाधक कु. अर्णव गणेश कुलकर्णी याच्या दहाव्या जन्मदिनानिमित्त वर्गातील मुलांना वाचनासाठी सनातन संस्थेचे बालसंस्कार मालिकेतील ग्रंथ भेट देण्यात आले. वर्गशिक्षक श्री. मल्लीनाथ व्हंड्राव यांनी हे ग्रंथ स्वीकारले. या वेळी सनातन संस्थेचे ‘बोधकथा’, ‘टी.व्ही. मोबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा’, ‘गुण जोपासा आदर्श व्हा !’ आदी ग्रंथ या वेळी भेट देण्यात आले. ज्ञानामृत कधीही शिळे होत नाही. एखाद्या गोष्टीचे ज्ञान मनुष्याला जीवनभर पुरते. त्यामुळे ‘चॉकलेट’ आणि ‘बिस्कीट’ अशा भौतिक वस्तू जन्मदिनानिमित्त देण्याऐवजी मुलांवर चांगले संस्कार करणारी पुस्तके वाचण्यास दिल्यास त्याचा मुलांना पुष्कळ लाभ होतो, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.