चारा घोटाळ्याच्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा !

६० लाख रुपयांचा दंड !

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करा ! – संपादक 

रांची (झारखंड) – झारखंडमधील डोरंडा कोषागारातून वर्ष १९९० ते १९९५ या कालावधीत अवैधरित्या १३९ कोटी ३५ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला.

या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावली जाणार आहे. यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित ४ प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे दुमका, देवघर आणि चाईबासा या कोषागारांतून पैसे काढण्याशी संबंधित होती.