महाराष्ट्रात कोण शासनकर्ते आहेत हेच समजत नाही ! – फडणवीस
नाशिक – कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला; मात्र महापालिकेने हे दायित्व स्वीकारले. राज्याने एक नव्या पैशाचे साहाय्य केले नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ‘ऑक्सिजन सिलींडर’ मिळाले. महाराष्ट्रात कोण शासनकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचे अस्तित्व नाही. राज्य मुंबईच्या बाहेरही आहे, हे सत्ताधार्यांना माहीत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी येथे सभेत केली.
महापालिका निवडणुकीत फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, शहर दत्तक घेतले म्हणजे प्रतिदिन महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असे नाही. शहरात एवढी कामे झाली आहेत, त्याचे कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांची कामे करण्यासाठी हवे असते.